धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्याने तळाशील ग्रामस्थ संतप्त

१५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा दिला इशारा

*⚡मालवण दि.०२-:* सागरी अतिक्रमणग्रस्त तोंडवळी – तळाशीलला कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक संरक्षक बंधारा व्हावा म्हणून अनेक वेळा निवेदन देऊन शासनाचे दरवाजे ठोठावूनही धूप प्रतिबंधक बंधारा न झाल्याने संतप्त बनलेल्या तळाशील वासीयांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी 19 वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. तशा आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदाराना देण्यात आले आहे. तोंडवळी तलाशिलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या तडाख्यामुळे होणारी धूप रोखण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने पाठवुनही त्याची दखल न घेतल्याने आज तळाशील ग्रामस्थांनी मालवण तहसीलदारांची भेट घेत निवेदन सादर केले यावेळी तळाशील ग्रामस्थांच्या वतीने तळाशिल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. जयहरी कोचरेकर यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, हे बेमुदत उपोषण तळाशील समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम तत्काळ सुरू करणे आणि कालावल खाडीतील तळाशील – रेवंडी समोरील वाळू उपसा बंद करणे अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी केले जाणार आहे . हे बेमुदत उपोषण जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत नाही , तसेच संबंधीत सक्षम अधिकाऱ्यांकडून त्याबाबतचे लेखी पत्र मिळेपर्यंत बेमुदत सुरू राहील असेही मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी संजय केळुस्कर, आनंद खडपकर,विवेक रेवंडकर, ताता टिकम, मुन्ना तांडेल, संजय जुवाटकर, प्रकाश बापार्डेकर , पुंडलिक जुवाटकर, अनिरुद्ध जुवाटकर आणि विजय रेवंडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page