सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचा चिपळूणसाठी मदतीचा हात
*⚡कणकवली दि. ०२-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक ट्रक जीवनावश्यक वस्तूभरून रवाना झाला. कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाकडून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी झेंडा दाखवून तसेच उद्योग व व्यापार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चिपळूण येथे रवाना करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शफिक खान, राष्ट्रवादी नेते काका कुडाळकर, बाळ कणयाळकर, भास्कर परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेंमकर, युवक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई उपस्थित होते.
