पुरळ ग्रामविकास अधिकारी एन.आर.तांबे यांचा निरोप समारंभ

ग्रामपंचायतीला मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल केले कौतुक

*⚡देवगड ता.०२-:* पुरळ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळणारे एन.आर.तांबे यांचा निरोप समारंभपर पुरळ गावाच्यावतीने नागरिक सत्कार ,उल्लेखनीय कामगिरी करुन ग्रामपंचायतीला मुख्य प्रवाहात आणल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात आले.नविन ग्रामविकास अधिकारी म्हणून मंगेश साळसकर यांनी पुरळ ग्रामपंचायतीचा कारभार हाती घेतला. तर मावळते अतिरिक्त ग्रामविकास अधिकारी यांना शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सरपंच अनुश्री तावडे यांनी गावच्यावतीने सत्कार केला. पुरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी हे पद गेली दोन वर्षे रिक्त होते. या रिक्त पदाचा अतिरिक्त कारभार पडेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एन.आर.तांबे यांच्याकडे होता. यावेळी तांबे यांना निरोप समारंभ देतेवेळी पुरळ ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अनुश्री तावडे,उपसरपंच अनिल पुरळकर,तलाठी संतोष डांगे,नवनिर्वाचित ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर,अयोध्याप्रसाद गावकर,ग्रामपंचायत सदस्य् ,अशोक मुळम,बाळु मुळम,समिक्षा तेली,अंकिता पुजारे,किमया गुरव,संदिप थोटम,निकिता मुळम,कृषी अधिकारी जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी निरोप समारंभपर पुरळ ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे एन.आर.तांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अतिरिक्त पुरळ गावचा कारभार सांभाळताना अनेक तक्रारींचे निवारण करुन लोकाभिमुख ग्रामपंचायत होण्याच्या दृष्टीकोनातून काम केले आहे. 14 वा वित्त्‍ आयोगाचा‍ अखर्चित निधी त्यांनी गावच्या जनतेला विश्वासामध्ये घेवून खर्च करुन पुरळ गावचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातुनही त्यांनी प्रयत्न केला. तसेच गावचे ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर त्यांना समाधान वाटेल अशा प्रकारची त्यांची कामे करुन अखंड पुरळ गावाच्या ग्रामस्थांच्या हदयामध्ये स्थान निर्माण केले. यामुळे त्यांचा पुरळ गावच्यावतिने निरोप समारंभपर विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अनुश्री तावडे,उपसरपंच अनिल पुरळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करतेवेळी ग्रामविकास अधिकारी एन.आर.तांबे यांचे कौतुक करुन त्यांनी ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याचेही उदगार काढले.असेच काम पुढील कारभार हाती घेतलेल्या ग्रामविकास अधिकारी यांनी करावे आणि पुरळ गावचा सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सचिव म्हणून प्रयत्न करावेत. चौक्डमध्ये घेणे – एन.आर.तांबे (ग्रामविकास अधिकारी ) पुरळ गावचा ग्रामविकास अधिकारी पदाचा गेले दोन वर्षे कारभार स्वीकारल्यानंतर पुरळ गावातील ग्रामस्थांनीही अनेक तक्रारींच्या विषयावरती चर्चा केल्यानंतर चर्चेअंति विषय निकाली निघायचे यामुळे पुरळ गावामध्ये 14 वा वित्त्‍ आयोगाचा निधी खर्च करतेवेळी कोणतीही अडचण‍ निर्माण झाली नाही. या गावातील जनता हि ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करणारी असल्यामुळेच गेल्या दोन वर्षामध्ये आपणाला चांगले काम करता आले.

You cannot copy content of this page