मसुरे भंडारी संघाच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ मसुरकर यांची निवड

*⚡मालवण दि.०२-:* भंडारी समाज सेवा संघ मसुरे कावावाडी स्थानिक कमिटी अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते मसुरे कावा वाडी चे सुपुत्र युवा सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ मसुरकर तर उपाध्यक्षपदी जीवन मुंनगेकर यांची एक मताने निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. सचिव – कृष्णा पाटिल खजिनदार- मिथुन खोत, सह खजिनदार – सतिश मसुरकर, तर सदस्यपदी यशवंत हिंदळेकर,संतोष वायंगणकर, विष्णू पेडणेकर, किरण पेडणेकर , साबाजी हडकर, विनय वि. गिरकर,चंद्रसेन पाटिल,सागर पाटिल यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी पंढरीनाथ मसुरकर यांनी भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपल्या सर्वांकडून करण्यात येतील असे सांगितले

You cannot copy content of this page