सांवतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १३ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात आज १३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

तालुक्यात मिळालेल्या 13 रुग्णांपैकी शहरात 1 तर ग्रामीण भागात 12 रुग्ण आढळले यात शहरातील खासकीलवाडा येथील एकाच समावेश आहे तर ग्रामीण भागातील 12 रुग्ण हे कोलगाव 2, इन्सुली 4, माडखोल 2, रोनापाल 1, बांदा 2, तळवडे 1 असे रुग्ण आढळून आले आहेत आतापर्यत 6117 रुग्ण आढळून आले आहेत तर 5764 जण बरे झाले आहेत आज मृत्यूची संख्या शून्य असून आतापर्यंत 149 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या स्थितीत 183 जण सक्रिय आहेत

You cannot copy content of this page