तुम्ही पुन्हा पंचनामे करा, परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करा

आम्ही ना.नारायण राणे यांच्या माध्यमातून मच्छिमारांना मदत मिळवून देऊ:दत्ता सामंत

*⚡मालवण दि.०२-:* तौक्ते चक्री वादळात नुकसानी झालेल्या मच्छिमारांना मदत देण्यात येत आहे या गोष्टीला आमची हरकत नाही परंतु जशी इतर मच्छिमारांना मदत मिळाली आहे त्याप्रमाणे वंचित राहिलेल्या मच्छिमारांना मदत मिळालीच पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी असून तुम्ही पुन्हा पंचनामे करा, परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना सादर करा. आम्ही मदतीपासून वंचित राहिलेल्या मच्छिमारांची व्यथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडे मांडून मच्छिमारांना मदत मिळवून देऊ असा इशारा भाजप नेते दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले. तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्वच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात विलंब होत असून मदतीपासून काहीजण वंचित राहिले आहेत वंचित राहिलेल्या या मच्छिमारांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि मत्स्य विभागाचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेविका पूजा करलकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, यासह मच्छिमार उपस्थित होते. यावेळी श्री सामंत यांनी सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ज्या मच्छिमारांकडे मासेमारीचा परवाना नाही, बोटी नाही, ज्यांचा मासेमारी व्यवसायच नाही त्यांना तौक्ते चक्रीवादळाची नुकसानभरपाई मिळाली आहे. त्यांना मदत देण्यास आमचा विरोध नाही. शासनाचा पैसा आहे, त्यांना अजून पैसे द्या. मात्र, जे खरे मच्छिमार आहेत, त्यांच्याकडे परवाने आहेत ते नुकसानभरपाई पासून वंचितच आहेत असा आरोप करत श्री दत्ता सामंत यांनी मत्स्य विभागाच्या कारभाराचा पोलखोल केला. यावेळी मदती पासून वंचित राहिलेल्या शेकडो मच्छिमारांची यादीच दत्ता सामंत यांनी मत्स्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. जर या प्रकरणाची केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या मार्फत चौकशी लावली तर मत्स्यविभाग अडचणीत येईल असा इशाराही दत्ता सामंत यांनी दिला

You cannot copy content of this page