वेंगुर्ले तालुक्याच्यावतीने आयोजन
*⚡वेंगुर्ला दि.०२-:* अकरा दिवसांपूर्वी बांदा-गाळेल येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या मठ-टाकयेवाडी येथील प्रसिद्ध क्रिकेटपटू गीतेश गावडे याला वेंगुर्ला तालुकावासियांतर्फे मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात श्रध्दांजली वाहाण्यात आली. तसेच शोधमोहिमेत मोलाची कामगिरी बजावणा-या एनडीआरएफचे अधिकारी व जवान तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा व सहकार्य करणा-या सर्व ग्रामस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मठ ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शोधमोहिम यशस्वीपणे राबविणारे एनडीआरएफचे अधिकारी व २१ जवान उपस्थित होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, महसुल कर्मचारी, बांदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी, सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, नगरसेवक नागेश गावडे, जिल्हापरिषद सदस्य, जेसीपी लोडरचे मालक आणि कर्मचारी, बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य, एनडीआरएफच्या जवानांना व इतर लोकांना जेवण व चहापाणी याची व्यवस्था करणारे बांदा-सटमटवाडी येथील परब कुटुंबिय, साईप्रसाद काणेकर, निलेश कदम, जय भोसले, ऋषी हरमलकर, सचिन वीर, हुसेन मकानदार या व इतर मदत करणा-या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक, सदस्या कविता मठकर, लक्ष्मी परब, बबन परब, अजित नाईक, बबन परब, विद्याधर कडुलकर, रोहित बोवलेकर, डॉ. सावंत, प्रसाद गावडे, प्रकाश गावडे, सचिन आईर, दिपक ठाकूर, किशोर पोतदार, माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, आबा मठकर, ग्रामसेवक विकास केळुसकर, तलाठी गवते, शिवप्रसाद सावंत, ताता घाटकर, शंभू परब, राजू पेडणेकर, बाळू भगत, आनंद सावंत, नामदेव सावंत, सुनिल गावडे तसेच जिल्ह्यातील शेकडो क्रिकेटपटू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मठ सरपंच तुळशीदास ठाकूर तर सुत्रसंचालन व आभार रविद्र खानोलकर यांनी मानले.
