आशिये बायपास रस्ता प्रश्न सुटणार

माजी उपसभापती महेश गुरव यांनी वेधले केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांचे लक्ष

*⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा आचरा बायपास म्हणजेच आशिये, कलमठ, वरवडे बायपास रस्त्याचा मार्ग मागील काही वर्षे प्रलंबित आहे. कलमठ, आशिये, वरवडे गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून कणकवली नगरपंचायत हद्दीतील पोस्ट खात्याच्या मालकीच्या जागेच्या भूसंपादनाअभावी हा बायपास मार्ग रखडला आहे याकडे कणकवली पं. स. चे माजी उपसभापती महेश गुरव यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे दिल्ली येथील भेटीत लक्ष वेधले. कणकवली हुन आचरा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहनांची वर्दळ असते. कणकवली पटवर्धन चौकापासून आचरा मार्गावरची वाहतूक कोंडी ही नित्यनेमाची झालेली आहे. यासाठी उपाय म्हणून आशिये कलमठ वरवडे हा बायपास मार्ग पुढे आला. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पोस्ट खात्याच्या जमिनी च्या भूसंपदाना अभावी हा बायपास मार्ग पूर्ण होऊ शकत नाही. मागील 12 वर्षांहून अधिक काळ यावर तोडगा निघालेला नाही. याबाबत माजी उपसभापती महेश गुरव यांनी केंद्रीय उद्योगमंत्री राणेंचे लक्ष वेधत या बायपास मार्गाच्या गरजेची तीव्रता कथन केली. सविस्तर चर्चेनंतर आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी प्राधान्य देऊन लवकरच आशिये-कलमठ-वरवडे बायपास रस्ता पूर्ण करण्याची ग्वाही केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांनी माजी उपसभापती महेश गुरव यांना दिली.

You cannot copy content of this page