*⚡वेंगुर्ला ता.०२-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वेंगुर्ला कॅम्प येथे रहाणा-या कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. वेंगुर्ला-कॅम्प परिसरामध्ये कातकरी समाजातील कुटुंबे झोपड्यांमध्ये रहातात. अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे यांच्या झोपड्यात पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. या समाजबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत या गरीब कुटुंबांना आवश्यक साहित्य प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.जी.चुकेवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.एल.बी.नैताम, प्रा.डी.आर.आरोलकर, प्रा.वामन गावडे आदी उपस्थित होते. ही मदत शंकर पवार, सुरेश पवार, बबलू पवार, नितीन पवार, राजू पवार, मनिष वेंगुर्लेकर, अंकुश निकम, चंदू पवार, अर्जुन पवार, बाबी पवार, बाबलो पवार, शिवाजी पवार, अजय निकम, मुत्तू चव्हाण, शिवकुमार राठोड, रेखा पूजारी या कुटुंबा देण्यात आली.
कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
