आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल- राजन तेली..

*💫कणकवली दि.१२-:* मालवण जलक्रीडा विषयात सत्ताधारी नेत्यांचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. स्थानिक मालकांचे आमदार परवानगी असल्याचे सांगून दिशाभूल करत आहेत. आमदार वेगळे सांगतात तर मंत्री वेगळा निर्णय सांगतात तर बदल विभागाकडून लक्रीडा करणार्‍यांवर कारवाई केली जाते. सत्ताधाऱ्यांकडून स्वार्थीपणा ने केलेली बदली मॅटमध्ये गेल्यावर रद्द झाली .जिल्हा शल्यचिकित्सक बदली प्रकरणात सत्ताधारी तोंडावर आपटले आहेत. एसटी कर्मचा-यांच्या प्रश्‍नांबाबत आमदार वैभव नही चुकीची माहिती देत आहेत एसटीच्या समस्या जैसे थेच आहेत.त्यामुळे कंटाळलेली जनता आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल,असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची १८ रोजी ६ वाजता बूथ अध्यक्षांशी व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष याचा राज्य दौरा असल्याने कार्यर्त्यामध्ये उत्साह आहे.राजस्थान मध्ये सर्वात जास्त जागा जिकून यश मिळविले. हैद्राबाद महानगरपालिका ४८ जागा जिंकुन भाजपाने यश मिळवले आहे.आता जिल्हात ७० ग्रामपंचायत व दोडामार्ग व वैभववाडी नगरपंचायत ,जिल्हा बँक,विकास संस्था निवडणूका होणार आहेत. या सर्व निवडणुकांची तयारी आम्ही करत आहोत जिल्ह्यात देखील भाजपचा मोठ्या टाकने विजय होईल.व्हर्च्युअल रॅली संदर्भात सायंकाळी ४ वाजता ऑनलाइन सभा पदाधिकारी,जिल्हा कार्यकारिणीची होणार आहे, असे राजन तेली यांनी सांगितले. मालवण जलक्रीडा विषयांत तरुण,तरुणी काम करताना दिसतात, दुर्दैवाने त्याचे व्यवसाय आहेत.त्यांचा खेळखंडोबा आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाला आहे.त्या व्यवसायिकांना त्रास होत आहे.आघाडी सरकारमधील आमदार व मंत्री चुकीचे सांगत आहेत. त्या व्यावसायिकांनी बँक कर्ज घेतले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ सत्ताधारी आणत आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी परवानगी देतात,आणि बंदर विभागाचे सचिव विरोध करताहेत. मंत्री दुसरीच भूमिका घेत आहे. राज्यातील आघाडी सरकार क्रूरपणे वागत आहे.भाजपा पूर्ण पाठीशी उभे राहणार आहे. त्या सचिवांशी आम्ही चर्चा करणार आहे. वेळ पडल्यास दर विभागच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राणे मंत्री असताना जाग्यावर परवानगी देण्यात आली होती. भाजपा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे. एसटी विषयावर मालवणचे आमदार यांनी प्रश्न मार्गी लावले असे सांगितात. पण अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे .भाजपने वेंगुले, कुडाळ,सावंतवाडी आंदोलने केली.एसटी कर्मचारी यांच्या जबरदस्ती ड्यूटी लावली जात आहे.एसटी कर्मचारी जाता येता एकाच एसटी मधून मुबंईत जातात. शाळा सुरू होऊन देखील विद्यार्थ्यांना पास दिले जात नाहीत. एसटीच्या भाजपला कायदा जरी हातात घ्यावा लागला तरी घेऊ,अधिकारी जबरदस्ती करत आहे.आम्ही जनतेच्या प्रश्नी आंदोलन करणार आहोत,एसटी कर्मचारी अडचणी लक्षत घेतल्या पाहिजेत. शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार पास देण्याची गरज आहे.प्रत्येक डेपोत भाजपा कार्यकर्ते जाब विचारतील.एसटी गरजेची गोष्ट आहे,अनेक कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्याची सूचना केली जात नाही.चित्र बदलणार कधी ? एसटी प्रश्नी राज्य सरकरची भूमिका संसद असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला.

You cannot copy content of this page