कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री वर्णी…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले नियुक्तीपत्र; राजन चिके यांच्या जागी नवा तालुकाध्यक्ष दिला…

*💫कणकवली दि.१२-:* भाजपाच्या शहर मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी (शहर मंडळ अध्यक्ष) पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नियुक्ती पत्र देत निवड जाहीर केली आहे. कलमठ गावचे मिलिंद मेस्त्री यांनी यापूर्वी कलमठ सरपंच, तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष व सामाजिक प्रश्नांवर आग्रही भूमिका मांडत त्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली आहे . सध्या ते पंचायत समिती सदस्य, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, भाजपच्या सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भाजपाच्या कणकवली शहरासहित नाटळ, हरकुळ , फोंडा, कासार्डे या विभागासाठी त्याची मंडळ अध्यक्ष असणार आहेत. जिल्हा परिषद चार विभागांमध्ये संघटनात्मक बांधणी करताना भारतीय जनता पार्टीचे विविध उपक्रम व विविध केंद्र शासनाच्या योजना लोकांना पर्यंत प्रभावीपणे पोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे नूतन तालुकाध्यक्ष मिलिद मेस्त्री यांना नियुक्तीपत्र भाजपा जिल्हाध्यक्ष राजन यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,गणेश तळगावकर, स्वप्नील चिंदरकर, सचिन पारधिये, जीवन राणे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page