कळणे मायनिंगमधील दुर्दैवी घटना तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानेच

मायनिंग कंपन्यांनी चुकीच्या प्रकारे केले उत्खनन;भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा आरोप

*⚡सावंतवाडी ता.२९ विनय वाडकर-:* कळणे मायनिंग कोसळून तेथील रस्त्यांवर आणि ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी व चिखल गेला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने हा प्रकार आज घडला असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. मायनिंग कंपन्यांनी चुकीच्या प्रकारे केलेल्या उत्खननामुळे हा प्रकार घडला असून, या उत्खननाला प्रशासनाचा पाठींबा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आतातरी प्रशासनाने डोळे उघडुन चुकीच्या प्रकारे होणाऱ्या उत्खननाची चौकशी करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पण आता ही जर प्रशासनाने यावर योग्य कारवाई न केल्यास हरिद लवादाकडे आपण तक्रार करु असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page