उद्योजक रुपेश सावंत, सुनील नारकर बनले चिपळूणवासीयांसाठी देवदूत
*⚡कणकवली दि.२९-:* खारेपाटण गावचे सुपुत्र आणि मुंबई – डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत , सुनील नारकर हे या पूरग्रस्तांच्या मदतीला एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. चिपळूण, खेड तसेच आजूबाजूच्या परिसरातील पूराच्या झळा सोसलेल्या या बांधवांना सावरण्यासाठी उद्योजक रुपेश सावंत आणि त्यांचे मित्र उद्योजक सुनिल नारकर यांनी दिलेला मदतीचा हात अनमोल आहे. चिपळूण आणि खेड तालुक्यातील पूरग्रस्त असलेल्या तब्बल १००० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करत संसारच पूराने कोलमडून पडलेल्या पूरग्रस्तांना रुपेश सावंत यांनी यांनी केलेली ही मदत लाखमोलाची आहे. फयान, तौक्ते वादळासारखी आस्मानी संकटांवर संकट सोसत असलेल्या कोकणवासियांना जुलै महिन्यात पुन्हा अतिवृष्टीच्या अस्मानी संकटाने पुरते जेरीस आणले. कित्तेकांचे संसार वाहून गेले.आता यातून सावरणं हे खुप मोठे आव्हान आहे. अशावेळी युवा उद्योजक रुपेश सावंत यांनी दिलेला हा मदतीचा हात खरंच लाखमोलाचा आहे. त्यांनी जीवनावश्यक साहित्य पॅकिंग करून किट बनवले. डाळ, तांदूळ, कांदा, बटाटा, मीठ मसाला, साखर, चहापावडर, साबण, पाण्याच्या बॉटल, चटई, कपडे असं आवश्यक असणारं साहित्य त्यांनी खरेदी केलं. तब्बल चार टेम्पो या साहित्याने भरले. त्यानंतर मग स्वतः त्या पूरग्रस्तांना भेटण्यासाठी आणि साहित्य वाटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना मदत केली. २७ आणि २८ जुलै या दोन दिवसांत स्वतः पूरग्रस्त भागातून फिरत त्यांनी या साहित्याचे वाटप केले. भारतीय समाज सेवा दल मार्केंडी, चिपळूण शंकरवाडी, वालोपे कुंभारवाडी, चिपळूण बाजारपेठ, खेर्डी भुरटेवाटी, खेर्डी नवापेठ या ठिकाणच्या आपत्तीग्रस्तांना भेट देत त्यांनी हे जीवनावश्यक साहित्य त्यांना प्रदान केलं. चिपळूण येथील ८०० कुटुंबांना आणि खेड मधील २०० कुटुंबांना त्यांनी हे साहित्य वाटप करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. जे गेलं ते पुन्हा मिळवता येईल. तुमचा आत्मविश्वास तुम्ही ढळू देऊ नका, असा त्यांना धीर दिला. उद्योजक रुपेश सावंत यांनी केलेली ईश्वरसेवा ही बहुमोलाची आहे. या पूरग्रस्तांना एक मायेचा आसरा मिळाला आहे. या कामात रम्मूरत गुप्ता, प्रणव म्हात्रे, धर्मेश म्हात्रे, प्रकाश मोरे, अजिंक्य नारकर, श्रीधर जाधव, रोशन धुमाळ, सुरेश मोरे, प्रदिप राणे, मंदार राणे, सुरज मोरे, रविंद्र चव्हाण, सुधाकर करंबळे, अशोक आरोलकर, सुरज घाडीगावकर, कोळंबकर, घनश्याम राणे, विनोद सपकाळ, विनोद घरत, प्रथमेश जाधव, अमोल परब, मिहिर रेपाळ, समीर वारे, मयुर वारे, अभिषेक सबानकर, प्रसाद यादव, सोहम वारे, अतुल वारे आदी सहकाऱ्यांनी रुपेश यांना बहुमोल अशी मदत केली.
