उभादांडा-वाघेश्वरवाडीत मिळाला कुजलेला अवस्थेत मृतदेह

*⚡वेंगुर्ला दि.२९-:* उभादांडा-वाघेश्वरवाडी येथील रहिवासी शैलेंद्र गजानन पेडणेकर (६०) यांना २८ जुलै रोजी सायंकाळी शेजारी सतीश मुणनकर हे त्यांच्या7 भावाचा निरोप देण्यासाठी गेले असता त्यांना पेडणेकर हे कुजलेल्या स्थितीत मृत आढळून आले. यासंदर्भात वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील उभादांडा- वाघेश्वरवाडी येथील उदय गजानन पेडणेकर यांनी आपल्या गावातील भावाची खुशाली घेण्यासाठी भावाकडे मोबाईल नसल्याने त्यांच्या नजीक रहाणारे सतीश रामचंद्र मुणगेकर यांच्या मोबाईलवर फोन केला. सतीश मुणगेकर हे तो मोबाईल चालू ठेवून शैलेंद्र पेडणेकर यांना देण्यास गेले. त्यावेळी हाका मारूनही घरातून ओ मिळत नसल्याने त्यांनी खिडकितून पाहिले असता घरांत कुजवट वास व माश्या घवघवत होत्या. त्यामुळे ते मृत झाले असावेत असा अंदाज बांधून त्यांनी गावचे पोलीस पाटील विजय नार्वेकर यांना कळविले. त्यानंतर घरात जाऊन खात्री केली असता ते खुर्चीवरच मृत झाल्याचे व कुजलेल्या स्थितीत दिसून आले. पोलीस पाटील विजय नार्वेकर यांनी याबाबत त्वरीत वेंगुर्ले पोलीस स्टेशनला याची खबर दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत, पोलीस सुरेश पाटील, राहुल बर्गे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान पेडणेकर यांचा मृत्यू हा हार्टअँटकने झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यांत येत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन आज केले जाणार असून त्यावेळी मृत्यू किती दिवसांपूर्वी झाला व कशामुळे झाला. याचा निश्चीत अंदाज समजू शकेल. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

You cannot copy content of this page