खाणीतील पाणी व चिखमय माती शेतीत व लोकवस्तीत दाखल
*💫दोडामार्ग दि.२९सुमित दळवी-:* कळणे गावात सध्या मायनिंग मोठया प्रमाणात चालते याच मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील काही भाग खाणीत कोसळला.परिणामी खाणीतील पाणी व चिखमय माती परिसरातील शेती व लोकवस्तीत आली आहे. रस्त्यावर पूर्णपणे चिखल आल्यामुळे वाहतूक करण्यास त्रासदायक ठरत आहे.कळणे मायनिंगची ही धोक्याची सुरुवात आहे,यावर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा भविष्यात या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो हे मात्र निश्चित.
