पूरस्थितीत केलेल्या मदतीबद्दल कातकरी समाज भारावला…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह प्रशासनाचे मानले आभार

कणकवली 29 जुलै (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे कणकवली शहरातील निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या 7 कातकरी कुटुंबातील सुमारे 22 कातकरी बांधवांचा पुरात त्यांचा संसारच वाहून गेला होता. या कातकरी बांधवांना  कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. याबद्दल पूरस्थिती केलेल्या मदतीबद्दल कातकरी समाजाने कणकवली नगरपंचायत येथे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, अभिजीत मुसळे, किशोर राणे व अन्य उपस्थित होते.

या कातकरी बांधवांच्या तीनही झोपड्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने या कातकरी बांधवांचे जीवनावश्यक व गृहोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यामुळे त्यांच्यासमोर या अस्मानी संकट उभे राहिले होते.याबाबत कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आपल्या कामातील कार्यतत्परता दाखवत नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत या स्थितीची पाहणी केली. कातकरी बांधवांना अल्पोपहाराची देखील तात्काळ व्यवस्था केली. तसेच या कातकरी बांधवांना चटई, बेडशीट, चादर असे साहित्य नगरपंचायत मार्फत तात्काळ सुपूर्द केले. यावेळी आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत राणे हे देखील उपस्थित होते. 
कातकरी बांधवांच्या निवार्‍याची सोय अखंड लोकमचंचे नामानंद मोडक व शैलेजा कदम यांनी पिसेकामते येथे केली असल्याने, कणकवलीतुन पिसेकमतेपर्यंत या सर्व कातकरी बांधवांना निवारास्थळी पोहचवण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे हे वाहनांची व्यवस्था करत होते.  कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधुत तावडे , पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकी बद्दल कातकरी बांधवांनी मधून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .

You cannot copy content of this page