जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीने चिपळूण पुरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियान

*💫सावंतवाडी दि.२८-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भक्त शिष्य साधक यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीने चिपळूण पुरग्रस्त भागामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले अभियानाची सुरुवात माऊलींच्या जयघोषाने करण्यात आली. पवारआळी, वाणीआळी, मुरादपुर मोहल्ला, शंकरवाडी, हनुमानमंदिर, साईमंदिर या भागातील १५० घरांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात जवळपास ३०० पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला होता स्वच्छता अभिमानाला दक्षिण रायगड निरीक्षक श्री. सुनिल वीर, मुख्यपीठ युवा पिठ निरीक्षक श्री अविनाश जागुष्टे, रत्नागिरी जिल्हा सेवाध्यक्ष श्री.बाळकृष्ण चव्हाण, सिंधुदूर्ग जिल्हा निरीक्षक श्री. संदीप नार्वेकर, गोवा पीठ युवा निरीक्षक श्री.राजेश गांवकर, गोवा पीठ धर्मक्षेत्र प्रमुख कु. प्रिया परब, गोवा पीठ देणगी प्रमुख श्री. लक्ष्मण नाईक तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, ज. न. म. प्रवचनका, प्रोटोकाँल, संग्राम सेना, युवासेना, महीला सेना भक्त शिष्यगण उपस्थिती होते. जगद्गुरु श्रीं च्या जयघोषाने स्वच्छता अभियानाची सांगता करण्यात आली. जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा, नाणिजधाम (पुरोहीत), रत्नागिरी येथिल गुरुबंधु श्री. सिद्धेश दळी,पुरोहीत विष्णु गुरुजी, लांजा येथिल गुरुबंधु श्री.सुभाष गुरव व कुंटुंबिय यांचे विशेष सहकार्य लाभले. सावंतवाडी सावंतवाडीत केवळ 5 चार्टर्ड अकांऊट्स आहेत. याचा अर्थ इतर व्यवसायिकांच्या मानाने सी.ए. होणे तशी कठीण परीक्षा आहे असे आज रोटरी क्लब, सावंतवाडीच्या माध्यमातून श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वेबीनार वर बोलताना रो.CA. सुधीर नाईक यानी सांगितले. या वेबीनार मध्ये 96 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्याना उद्देशून बोलताना रो.CA.सुधीर नाईक म्हणाले. आज उपस्थित असलेल्या 96 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी जरी उद्या सी.ए. झाला तरी हे या वेबीनारचे यश म्हणता येईल. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही वेबीनार पार पडली. रोटरी सदस्य आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा.रो.सचिन देशमुख यानी या वेबीनारचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार आणि उपाध्यक्ष रो.दिलीप म्हापसेकर, रो.ॲड.दिपक नेवगी रोटेरीयन्स यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page