वेबीनारमध्ये ९६ विद्यार्थ्यांचा सहभाग
*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडीत केवळ ५ चार्टर्ड अकांऊट्स आहेत. याचा अर्थ इतर व्यवसायिकांच्या मानाने सीए होणे तशी कठीण परीक्षा आहे, असे प्रतिपादन रो. सीए सुधीर नाईक यांनी केले. रोटरी क्लब, सावंतवाडीच्या माध्यमातून श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वेबीनारवेळी ते बोलत होते. यावेळी रोटरी अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार, उपाध्यक्ष रो. दिलीप म्हापसेकर, रो. ॲड. दीपक नेवगी उपस्थित होते. रोटरी सदस्य आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. रो. सचिन देशमुख यानी या वेबीनारचे आयोजन केले होते. या वेबीनारमध्ये ९६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सुधीर नाईक म्हणाले. आज उपस्थित असलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी जरी उद्या सीए झाला तरी हे या वेबीनारचे यश म्हणता येईल, असे सांगितले.
