तेजस सुर्वे यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

*💫सावंतवाडी दि.२८-:* तेजस सुर्वे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश मिळवले असून कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडियाचे अध्यक्ष मा. मेहुल वोरा यांच्या हस्ते निदान ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. यावेळी कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडियाचे खनिजदार व कुडो असोसिएशन महाराष्चे सचिव जस्मिन मकवाना, कुडो रेफ्री कौन्सिल विपुल सुरु, पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया व पुणे जिल्हा कुडो असोसिएशन अध्यक्ष अरविंद मोरे उपस्थित होते निप्पोन बुडो सोगो हा कुडो मिक्स मार्शल आर्टचा पाया आहे. निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया संस्थेमार्फत ब्लॅक बेल्ट पदवी घेतलेले सन्मानीय ब्लॅक बेल्ट आदित्य ठाकरे, कतरीना कैफ, रणवीर कपूर, सोनाक्षी सिन्हा, कपिल शर्मा, विकी कौशल, टायगर श्रॉफ असून त्यात आता प्रथमच पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहरातील एकूण ४२ ब्लॅक बेल्टला हा मान मिळाला आहे. या यशाबद्दल तेजस सुर्व यांचे पिंपरी चिंचवड कुडो संघटना, पुणे शहर कुडो संघटना, पुणे ग्रामीण कुडो संघटना व पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया मार्फत हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page