आ. वैभव नाईक पोहोचले चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला

विविध भागात भेट देऊन नागरिकांना दिला धीर

*💫कणकवली दि२८-:* खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी चिपळूण दौरा करत पूरस्थिती उद्भवलेल्या विविध भागात भेट दिली. शिवसेनेच्या माध्यमातून मुंबई येथून उपलब्ध झालेली जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरग्रस्तांना पुरविण्यात आली. यावेळी नागरिकांना धीर देण्यात आला. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली होती. नागरिकांची घरे पाण्याखाली जाऊन अतोनात नुकसान झाले. आ. वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील पूरस्थितीमूळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून झाल्यानंतर त्यांनी आज चिपळूण दौरा करत तेथील बहाद्दूर शेट नाका, मफत लाल कॉलनी,खेरडी माळेवाड, संकल्प कॉलनी,चिपळूण बसस्थानक, अशा विविध भागातील नुकसानीची पाहणी केली. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यात आली. यावेळी राजापूर, लांजा,साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक किरण सामंत,रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम,विलास चाळके, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, चिपळूण तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे, कणकवली येथील शिवसैनिक भूषण परुळेकर,रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page