नुकसान ग्रस्तांसाठी मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशनचा मदतीचा हात

संस्थेच्या माध्यमातून जमा केलेली मदत तब्बल १०८ कुटुंबियांना देण्याचा निर्णय;संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.१८-:* बांदा, शेर्ले, वाफोली व दोडामार्ग तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी सावंतवाडी शहरातील मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशन धावले असून संस्थेच्या माध्यमातून जमा केलेली मदत तब्बल १०८ कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांनी दिली ही मदत संबंधित नुकसानग्रस्त भागाकडे आज रवाना करण्यात आली. चार टेम्पो भरून तांदूळ, तेल, कडधान्य आदी जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले असून हे वाटप आज संबंधित नुकसान ग्रस्त भागात होणार आहे. या नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी अध्यक्ष सोहाब बेग, सचिव सलीम मुल्ला, सहसचिव रिजवान पटेल, खजिनदार ताजुद्दीन शेख, सहखजिनदार मोहसीन मुल्ला, सदस्य तबरेज बेग, नदीम दुर्वेश, फारुक शेख, कुतुबुद्दीन शेख, बासित पडवेकर, मलिकजान नदाफ, अन्वर शहा, आसीम पीर, सोहेल बेग, सोहराब बेग, इमाद शेख, इर्शान बुरान, आसिफ शेख, सर्फराज दुर्वेश, हुसेन शेख, मुजाहिद पिरजादे, रौनक वाडीकर, सोहेल करजगी, शौकत नदाफ, याकुब शेख, शोएब दुर्वेश, जाफर खणापुरी आदींच्या पुढाकाराने ही मदत गोळा करण्यात आली. या उपक्रमासाठी सर्व धर्मियांनी मदत केल्याबद्दल फाऊंडेशनच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page