इंजिनीअरिंग अभ्यासक्रम व संधीबाबत विद्यार्थी व पालकांचे शंकानिरसन करणार

मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांनी दिली माहिती

*💫मालवण दि.२८-:* मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम व करियर संधी याबाबत माहिती मिळणे काहीसे गैरसोयीचे ठरत असून ही गैरसोय दूर करण्याच्यादृष्टीने तसेच डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम व त्यातील संधी याबाबत विद्यार्थी व पालकांचे शंकानिरसन करण्याकरिता ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांनी दिली मालवण येथील शासकीय तंत्रशिक्षण या संस्थेमधून दरवर्षी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एम. पी. एस. सी. ने निवड केलेल्या प्राध्यापकांच्या मार्फत पदविका अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, संस्थेमार्फत नोकरीच्या संधी प्राप्त करून बाहेर पडतात. सिधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर अत्यल्प खर्चात तंत्रशिक्षण व नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने हि संस्था सतत झटत असून या संस्थेमार्फत तंत्र शिक्षणाबाबत ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक खर्च, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे यांविषयी माहिती प्राप्त करून घेण्याकरिता संस्थेतील प्राध्यापक डॉ. योगेश महाडिक मोबा. ९४२३६८२८४६, श्री. दत्तप्रसाद गोलतकर मोबा. ९७६४५१३१३३, श्री. संदेश जोशी मोबा ९४२२६४१३८४ यांचेशी संपर्क साधावा तसेच www. gpmalvan. co.in या वेबसाइट ला भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page