Headlines

नवीन आरोग्य केंद्रांची प्रक्रिया राबविली जिल्हा परिषदेने

तरीही मंजुरी मिळालेली नसताना स्थानीक नेत्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न;जी प अध्यक्षा संजना सावंत यांचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ११ आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्याची चुकीची माहिती देऊन काही स्थानिक नेते लोकांची दिशाभूल करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षात या आरोग्य केंद्रांची मागणी आणि सर्व प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली आहे .लवकरच या आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळेल पण अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी स्पष्ट केले.  तर कोणी श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करत असेल अशा नेत्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये .असे आवाहन पत्रकारांशी बोलताना केले.

यावेळी माहिती देताना जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत म्हणाल्या, ५ फेब्रुवारी २०२० रोजी आरोग्य सेवा संचालनालयाकडून पत्राद्वारे आरोग्य समिती ,जिल्हा परिषद सभा व जिल्हा नियोजन समिती सभा यांच्या मान्यतेने १ प्राथमिक आरोग्य केंद्र व ११ उपकेंद्र नव्याने मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठविन्यास कळविले होते. त्या नुसार १४ फेब्रुवारी २०२० रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मान्यतेसाठी जिल्हा आरोग्य सभापती यांनी खास सभा आयोजित करून  प्राथमिक आरोग्य केंद्र व ११ उपकेंद्र ला मंजुरी मिळणे बाबत ठराव संमत केला होता. तसेच २० मार्च २०२० रोजी च्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत प्रस्तावित नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठीचा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर २९ मार्च २०२० रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या शिफारशी करिता जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केला होता. जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप पक्षाचे बहुमत असल्याने सदर ठराव बहुमताने संमत करण्यात आला .अशा प्रकारे या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजुरी च्या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी अग्रेसर राहिले. या आरोग्य केंद्रांच्या मंजुरीसाठी आरोग्य संचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. लवकरच आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळेल मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असेही यावेळी संजना सावंत यांनी स्पष्ट केले. तर काही स्थानिक नेते श्रेय लाटण्यासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र व ११ उपकेंद्र यांना मंजुरी मिळाल्याची चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये जिल्हा परिषदेमार्फत मंजुरीसाठी आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावातील आरोग्य केंद्रांमध्ये कुडाळ तालुक्यातील सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, व गोवेरी, माड्याची वाडी या उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यात भोम- कोलगाव ,सोनुर्ली, दोडामार्ग तालुक्यात मोरगाव, वझरे, घोडगे वाडी ,वेंगुर्ला तालुक्यात रेडी नंबर २ ,पेडूर, कांबळेवीर ,तर कणकवली तालुक्यातील असलदे या आरोग्य उपकेंद्र यांचा समावेश आहे. या केंद्रांना लवकरच मंजुरी मिळेल असे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page