पुरग्रस्तांच्या मदतीत सेवांगणसह सर्जेकोटवासीयांनी उचलला खारीचा वाटा…

मालवण, दि प्रतिनिधी चिपळूण, महाड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शिर्लेसह आजूबाजूच्या गावामध्ये भयावह पूरपरिस्थिती आली. याचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक बांधिलकीतून येथील बॅ. नाथ पै सेवांगण सह सर्जेकोट गावातील दानशूर व्यक्तींनी अत्यावश्यक साहित्यासह कपडे तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून देत खारीचा वाटा उचलला. ढगफुटीमुळे चिपळूण, महाड यासह जिल्ह्यातील बांदा परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मालवण तालुक्याने पुढाकार घेतला. यात बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात सर्जेकोट गावातील मच्छीमार बांधवांसह अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत अत्यावश्यक साहित्यासह, कपडे अन्य साहित्य उपलब्ध करून दिले. हे साहित्य गेल्या तीन दिवसांच्या काळात चिपळूणसह बांदा परिसरातील पूरग्रस्तांना पोचविण्यात आले. पूरपरिस्थिती मुळे ओढवलेल्या संकट काळात सामाजिक बांधिलकी जोपासत सेवांगणसह सर्जेकोटवासीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page