दोन दिवसात तब्बल १७ जणांचे वाचविले प्राण
*💫सावंतवाडी दि.२८ :* कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागत आहे. अशावेळी सावंतवाडी तालुक्यातील युवा रक्तदाता संघटना ‘ब्लड बँक’ म्हणून काम करत असून आज पुन्हा एकदा हे सिद्ध झाल आहे. संघटनेच्या माध्यमातून १५ जणांनी रक्तदान करत दोन दिवासात तब्बल १७ जणांचे प्राण वाचविण्याच काम युवा रक्तदात्यांनी केल असून याच सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये विशेष म्हणजे सिंधुदुर्ग लसिबीचे पोलीस अधिकारी प्रमोद काळसेकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मुरली चव्हाण यांनी देखील पुढाकार घेत रुग्णांचे जीव वाचवले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या समीक्षा राणे या महिलेस ‘बी पॉझिटीव्ह’ या रक्तगटाची तातडीन आवश्यकता असताना या रुग्णालयाचे डॉक्टर मुरली चव्हाण यांनी स्वत: रक्तदान करत त्या महिलेस जीवदान दिल. सिंधुदुर्ग लसिबीचे पोलीस अधिकारी प्रमोद काळसेकर यांनी ‘ए पॉझिटीव्ह’ रक्तगटाची आवश्यकता असणाऱ्या रुग्णाचे प्राण वाचवले. याच दरम्यान, डॉ. दुर्भाटकर यांनी प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव झाल्यानं अत्यंत तातडीने ‘एबी पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यकता असल्याचा निरोप देण्यात आला. याच वेळी शहरातील युवक कृष्णा धूळपणावर यांनी रक्तदान करत सोनाली सारसकर यांचा जीव वाचवला. तर गोवा व्हिजन हॉस्पिटल इथं संकपाळ या रुग्णाला ‘बी पॉझिटीव्ह’ या रक्तगटाची तातडीन आवश्यकता असताना माजगाव येथील बंटी चंद्रकात कासार यांनी गोव्यात जात रक्तदान करून रुग्णाला जीवदान दिल. तसेच सावंतवाडीतील डॉ. देशपांडे यांच्या क्लिनिकमध्ये असणाऱ्या राजश्री गावडे या रुग्णाला ‘बी पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना प्रथमेश सुकी, तौसीफ शेख यांनी रक्तदान केल. तर उपजिल्हा रूग्णालयातील तबसुम शेख या रुग्णाला ‘बी पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना धीरज चव्हाण यांनी रक्तदान केल. सावंतवाडीतील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयातील योगिनी पाटणकर, आर्या भाईडकर यांना ‘ए पॉझिटीव्ह’ रक्तगटाची आवश्यकता असताना शुभम बिद्रे, नागराज मळकाचे यांनी रक्तदान करत जीव वाचवले. तर दुर्मिळ असणाऱ्या ‘ए निगेटिव्ह’ या रक्ताची रत्नमाला पनवेलकर यांना आवश्यकता असताना गौरांग रेगे यांनी रक्तदान करत जीवदान दिल. धवडकी येथील अजित राऊळ यांना ‘ए पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना भाईसाहेब आयुर्वेद कॉलेजचे विद्यार्थी रविकांत नरडवे यांनी रक्तदान केल. तर बबन गावडे यांना ‘ओ पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना प्रज्वल नाईक यांनी रक्तदान केल. वंदना कासार या रुग्णाला ‘ओ पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना अभिजित गवस यांनी, तर प्रिया गावडे या महिलेला ‘ए पॉझिटीव्ह’ रक्ताची आवश्यता असताना सुंदर हळदणकर, आकाश परब यांनी रक्तदान केले एबी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची आवश्यकता होती तेव्हा श्री सतिश नाईक यांनी, तर रोझारियो फर्नांडिस या रुग्णाला सुदेश नेवगी यांन रक्तदान केले आहे. देव्या सूर्याजी यांनी या सर्व मागणीसाठी दिवस रात्र विशेष मेहनत घेत रक्ताची पुर्तता केली.यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्तदाते व देव्या सुर्याजी यांचे आभार मानले तर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा पडत असून रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्ताचा तुटवडा दूर करावा अस आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केल आहे.
