शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा पुढाकार
*💫कणकवली दि२८-:* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यातर्फे शिवडाव गावात गरजूंना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नितीन हरमलकर, गणेश शिवडावकर, दिपक कोरगांवकर, निकेतन भिसे, मुन्ना तेली, लक्ष्मीकांत लाड व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.
