जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा उपक्रम
*💫कणकवली दि.२८-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते खारेपाटण येथे झाले. तसेच खारेपाटण कोविड सेंटरसाठी १००० मास्क देण्यात आले. यावेळी सोबत शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख गोट्या कोलसुलकर, माजी सभापती संदेश पटेल, शहरप्रमुख संतोष घाटे, महिला विभागप्रमुख सायली तुरळकर, महिला उपविभागप्रमुख आस्था पाटणकर, शाखाप्रमुख शिवाजी राऊत, भूषण शेलार, लाड, गिरीश करगुंटकर, युवासेना विभागप्रमुख तेजस राऊळ, संतोष तुरळकर, दिगबर गुरव, गिरीश पाटणकर, व पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले.
