चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ’टायगर ग्रुप’तर्फे मदतीचा हात

*💫कणकवली दि२८-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टायगर ग्रुप कोकणच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.या ग्रुपच्यावतीने पूर ग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली आहे. टायगर ग्रुप कोकण सिंधुदुर्ग विभाग सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे .कोकणात आठ दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले.आयुष्यभर जमा केलेली पुंजी आणि संसार काही क्षणात पुरात वाहून गेला. या पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी टायगर ग्रुप सरसावला आहे.कणकवली येथून जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, उपाध्यक्ष हर्षल बेळकर, संपर्कप्रमुख व संघटक प्रयाग कांबळी, जिल्हा प्रसिद्धप्रमुख सिद्धेश भोगले सागर पवार, केदार खोत, आदित्य मोरे, मालवण तालुकाप्रमुख दिपेश पवार, राहुल मसुरकर, अक्षय रजपूत, रोहित नार्वेकर, अक्षय चव्हाण, शंकर राणे, दिनेश पवार, प्रथमेश परब, जयेश राजिवडेकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page