धुप प्रतिबंधक बंधारा तात्काळ उभारा

सांगवे पामतेल ते शिवडाव राऊळवाडी बंधाऱ्याजवळ रस्ता झालाय खराब;सतीश सावंत यांची पालकामंत्र्याजवळ मागणी

  ओरोस-:       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाटळ येथील मल्हार पुल कोसळल्याने येथील नागरिकांना कनेडी येथे येण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या तालुक्यातील सांगवे पामतेल ते शिवडाव राऊळवाडी येथील ब्रिजकम बंधाऱ्या जवळ धुपप्रतीबांधक बंधारा बाधण्यासाठी सबंधित विभागाला आदेश देण्यात यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.             सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठवड्यात (२२जुलै रोजी) झालेल्या अतिवृष्टीमुळे गडनदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कणकवली तालुक्यातील सांगवे पामतेल ते शिवडाव राऊळवाडी दरम्यान बांधणेत आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याचे शेवटचे दोन पिलर दरम्यान घालणेत आलेला भराव व त्याला करणेत आलेले दगडाचे पीचींग पूर्णपणे वाहून गेले आहे. त्यामुळे बंधान्याच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्ता पूर्णपणे खचून वाहून गेलेला आहे. सद्यस्थितीत कणकवली कनेडी नरडवे मार्गावरील नाटळ येथील मल्हार नदीवरील पूल पुरामध्ये पूर्णपणे कोसळून गेल्यामुळे त्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना कनेडी येथे येण्यासाठी शिवडाव राऊळवाडी ते सांगवे पामतेल हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. परंतु बंधान्यांच्या दोन्ही बाजूकडील भराव व पिचींग वाहून गेल्याने बंधारा देखील रहदारीसाठी धोकादायक झालेला आहे. म्हणून पाटबंधारे विभागाने बंधायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्हीकडेच्या पिलरजवळ धुपप्रतिबंधक बांध (संरक्षण भिंत) लवकरात लवकर बांधणे आवश्यक आहे. तरी या धुप प्रतिबंधक बांध तात्काळ बांधणेसाठी संबंधीत विभागा ला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page