वनविभागाच्यावतीने देवगड समुद्रात आले सोडण्यात*
*💫देवगड दि.२७-:* पडवणे बीचवरती परदेशी पर्यटक यांना जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार करुन रेस्क्यू टिमच्यामदतीने सदर कासवाला देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूपपणे वनविभागाच्यावतीने जीवनदान देण्यात आले. पडवणे बीच वर परदेशी पर्यटक जोसेफ कोबुन व थॉमस यांना जखमी ऑलिव्ह रिडले कासव आढळले त्यांनी वनविभाग अधिकारी लिमये साहेब यांना संपर्क साधला व त्यानंतर सर्व सूत्र हलून वनविभाग सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना फोनवरून संपर्क साधला गेला व त्यानंतर कणकवली वनविभागाचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी घटनास्थळी पडवणे येथे भेट दिली. त्याचवेळी महाड – चिपळूण येथे रेस्क्यू ऑपरेशन साठी आलेल्या पुणे येथील रेस्क्यू टिम आपले काम आटोपून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली होती. सदर टिम ही ॲनिमल रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ची पुणे बावधन येथील एक रेस्क्यू टिम होती. त्यांनी पडवणे येथे जाऊन जखमी ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार केले. या कासवाचा पुढील एक डावा पाय नव्हता व मागील उजवा पाय देखील कट झाला होता. तसेच डोळ्याला छोटीशी जखम झाली होती. या ॲनिमल रेस्क्यू टिम मध्ये तुहिन सातारकर , डॉ.निकिता मेहता , विश्वेश महाजन, हर्षद नागवे ,निखिल पाटील, नरेश चांडक यांचा समावेश होता.त्यांच्यासोबत कणकवली देवगड क्षेत्राचे वनपाल मुळे सर होते . त्यांनी सदर कासव व्यवस्थित झाल्यावर तारामुंबरी येथील बीच वर सोडण्याचा प्रयत्न केला.परंतू रेस्क्यू टिम ला देवगड येथे फायबर पात उपलब्ध झाल्याने सदर कासव नौका मालक ललितेश खडपकर यांच्या फायबरच्या पातीने देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूप पणे सोडण्यात आले. यावेळी सदर टिमला ललितेश खडपकर,अवि खडपकर, रुपेश कुबडे यांनी तर तारामुंबरी येथील भैरवनाथ बचत गटाच्या महिला प्रियांका तारी , प्रियांका खवळे तसेच कासव मित्र अक्षय खवळे ,दिपक खवळे व हितेश खवळे आणि तारामुंबरी कांदळवन समिती सदस्य लक्ष्मण तारी यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. यावेळी तारामुंबरी कांदळवन प्रकल्प समन्वयक योगिता शेरे या देखील उपस्थित
