सावंतवाडी आगारातून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी बस सेवा सुरु

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी आगारातून आजपासून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी मार्गांवरील बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत, अशी महिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.. सायंकाळी ६.४५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे) (शिवशाही), सकाळी ७.१५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे), सकाळी ९ वाजता सावंतवाडी-तुळजापूर (आंबोलीमार्गे), दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी-कोल्हापूर (आंबोलीमार्गे), सकाळी ७ ३०, १०.३० आणि दुपारी १ वाजता सावंतवाडी – रत्नागिरी तर सकाळी ६.००, ७.००, सायंकाळी ५.०० वाजता रत्नागिरी-सावंतवाडी अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी ९१२३६३२७२०११ या नंबरवर संपर्क साधावयाचा आहे, असे आवाहनही पडोळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page