मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटप
*💫मालवण दि२७-:* राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून मालवण येथील अ शि दे टोपीवाला हायस्कुल व कन्याशाळा या दोन्ही शाळांना प्रत्येकी चार संगणक संच मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना बबन शिंदे, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक व नगरसेविका सौ. सेजल परब, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शीरपुटे, संमेश परब, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे, स्कुल कमिटी अध्यक्ष संदेश कोयंडे, वैशाली चव्हाण, विना नाईक, नूतन घडशी, आनंद नाईक, महादेव गावकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दरवर्षी शिवसेनेकडून पक्षप्रमुखांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेकडून सामाजिक उपक्रम राबवून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून शाळांना संगणक संच प्रदान करण्यात येत आहेत असे यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचा कारभार करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या शाळेच्या मागणीनुसार मालवण तालुका शिवसेना व आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी संगणक संच उपलब्ध करून दिले आहेत. वह्या वाटप असु दे अन्यथा शैक्षणिक उपक्रम असुदेत यात नेहमीच शिवसेना आम्हाला सहकार्य करीत असल्याचे वैशाली चव्हाण यांनी सांगितले
