श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी काॅलेजचा १०० टक्के निकाल

*💫कणकवली दि२७-:* सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) काॅलेजचा अंतिम वर्ष सेमी -७, तृतिय वर्ष सेमी-५ व व्दितीय वर्ष सेमी -३ चा निकाल १०० टक्के निकाल लागला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या वतीने बी.फार्मसी पदवीसाठी हिवाळी परीक्षा 2020 घेण्यात आल्या होत्या.यात अंतिम वर्ष बी. फार्मसी सेमी.७ मध्ये प्रथम प्रीती पटेल ९.९२,द्वितीय चिंतन दवंडे  ९.८३,तृतिय तन्वी चौकेकर, आकांक्षा फोंडके, यशस्वी धामापूरकर, ऋषिकेश सावंत ९.७५,तृतीय वर्ष बी. फार्मसी सेमी. ५ मध्ये प्रथम रुचिता भागवत, अक्षता उपडे ९.४६ ,तृतीय वर्षात सिद्धांत सावंत,दिप्ती कदम,झीनत शेख ९.३१ , तृतिय ओमकार परब,प्रथमेश म्हात्रे,यश चिंदरकर  ९.२३ तर द्वितीय वर्ष बी. फार्मसी सेमी. ३ मध्ये प्रथम रोशनी शेट्ये १०.००,व्दितीय अमृता शित्याळकर ९.५०,तृतिय ऐश्वर्या होडावडेकर  ९.४२ या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, प्राचार्य तुकाराम केदार,प्रा. विलास मळे, प्रा.अखिल कारेकर, प्रा. रोहिणी विचारे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page