रज्जाक बटवाले यांची मागणी;भरमसाट बिलामुळे नागरिक हैराण
*💫कणकवली दि२७-:* नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांचे विज बिल भरमसाट आल्याने अक्षरशः शॉक बसायची वेळ आली आहे. त्यामुळे दोन ते तीन हप्प्यांत विज बिल भरायची अनुमती देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी नांदगाव येथील विज वितरण अभियंता श्री. पंडित यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली आहे. विज बिल भरताना जी. एस. टी. सर्व्हिस कर आकारले जात आहेत. त्यामुळे बिलाची रक्कम वाढून येते. त्यामुळे हे कर त्वरीत रद्द करण्यात यावे, असे बटवाले यांनी म्हटले आहे. पूर्वी लाईट बिल जिल्हा बँक शाखा नांदगाव व पोस्ट ऑफिस येथे भरले जायचे. परंतु आता आलेली लाईट बिल कुठे भरायचे, याबाबत काहीच कल्पना नसल्याने नांदगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे विज बिल भरण्यासाठी जिल्हा बँक येथे परवानगी देण्यात यावी. अन्यथा सर्व ग्राहक हे लाईट बिल विज मंडळाच्या ऑफिसमध्ये जमा करतील आणि याला सर्वस्वी जवाबदार विज वितरण विभाग राहिल, असा इशारा रज्जाक बटवाले यांनी दिला आहे.
