वैश्य समाज कणकवलीतर्फे मनाली तायशेटेचा सत्कार

दहावी परीक्षेतील यशाबद्दल केला सन्मान

*💫कणकवली दि२७-:* महाराष्ट्र राज्य माध्यमिक अन् उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा २०२०-२१ या वर्षाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहिर झाला. यात कोकण विभागाने १००% निकालासह संपूर्ण राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश प्राप्त करत १००% निकाल लावला आहे. एस. एम. हायस्कूल कणकवली मधील विद्यार्थिनी कु. मनाली नितिन तायशेटे हिने १००% निकाल नोंदवत नवीन कीर्तिमान स्थापित केले. यानिमित्त वैश्य समाज कणकवली तालुका तर्फे सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या यशाचे श्रेय तिने आईवडील अन गुरुजनांना दिले असून इंजीनियरिंग क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार असलेचे सुतोवाच केले आहे. याप्रसंगी वैश्यसमाज अध्यक्ष सर्वश्री दादा कुडतरकर, सेक्रेटरी महेंद्र मुरकर, उपाध्यक्ष गुरुनाथ पावसकर, कोषाध्यक्ष लवु पिलनकर, सल्लागार ॲड. दीपक अंधारी, मनाली तायशेते आणि तिचे कुटुंबिय उपस्थित होते. वैश्य समाजातील सन २०१९-२० अन् २०२०-२१ मधील १० वी अन १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार लॉकडाऊन संपल्यावर करण्यात येणार असल्याची माहिती समाजातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली माहिती मार्कलिस्टसह वैश्य समाज सेक्रेटरी महेंद्र मुरकर यांच्याकडे ९११२७२३७३ / ९४२२३७९०९० या व्हाट्सॲप नंबरवर येत्या ७ दिवसांत पाठवावी, असे आवाहन वैश्य समाज कणकवली तालुकातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page