पूरग्रस्तांचे पाण्याविना हाल होऊ नयेत म्हणून विनू महाडिक धावले

वेदा जनरेटर सर्व्हिस’द्वारे घरोघरी पिण्याचे पाणी केले उपलब्ध

*💫कणकवली दि२७-:* अतिवृष्टीमुळे चिपळूण येथील खेर्डीत गेले चार दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यांचे पाण्याविना हाल होऊ नये म्हणून ’वेदा जनरेटर सर्व्हिस’चे यशवंत उर्फ विनू महाडिक मदतीला धावले असून ’वेदा जनरेटर सर्व्हिस’द्वारे घरोघरी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना होणार हाल टळले आहेत. विनू यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, कणकवलीतील कोणाच्या नातेवाईकांचे चिपळूणमध्ये पाण्याविना हाल होत असतील त्यांनी विनू महाडिक यांच्या (8600885544) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page