मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम
*💫कणकवली दि.२७-:* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयास जम्बो ऑक्सिजन ट्रॉली, ऑक्सिजन मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख शेखर राणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राणे, संदेश सावंत पटेल, विलास गुडेकर, प्रसाद अंधारी, तेजस राणे, सुजित जाधव, बाबू जाधव, संतोष राणे, माधवी दळवी, प्रतिभा अवसरे, सुवर्णा राणे, दिव्या साळगावकर, साक्षी आमडोस्कर, अश्विनी मोर्ये, प्रमोद पिळणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. डॉ. चांदमुबारक शिकलगार, डॉ. सतीश टॉक, परिचालिका नुपूर पवार यांच्याकडे सतीश सावंत यांनी जम्बो ऑक्सिजन ट्रॉली व अक्सिजन मास्क सुपूर्द केले.
