गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेणार

दारू वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी बांदा लाठीवर मॅन पॉवर वाढवणार – पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे

*💫सावंतवाडी ता.२६ प्रसन्न गोदावळे -:* गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यांच्या शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. आज गांजा प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच दारू वाहतुकीवर देखील लगाम लावण्यासाठी बांदा लाठीवर मॅन पाॅवर वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page