बांदा शहरात बसवीणार तीन सायरन

पुरस्थितीची माहिती मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश;

*💫सावंतवाडी ता.२६-:* बांदा शहरासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून एका बोटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बांदा येथील व्यापाऱ्यांनी केली. यावेळी या साहित्यासाठी जो फंड लागेल तो आपण मिळून देऊ, असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित व्यापारी व अधीक्षक यांना सांगितले. तसेच बांदा येथे तीन सायरन बसवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी प्रशासनाला दिल्या असून, येत्या आठ दिवसांत शहरात तीन ठिकाणी बसवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. एका सायरनचा आवाज हा तीन किलो मिटर पर्यंत येणार असल्याने परिस्थितीची माहिती नागरिकांना मिळणार आहे.बांदा येथील व्यापाऱ्यांचे पुरामुळे झालेल्या नुकसान संदर्भात आज बांदा व्यापाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष, हिदायतुल्ला खान, उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, तालुका सदस्य संतोष जोईल, उद्योग व्यापार जिल्हा सरचिटणीस नियाज् शेख आदी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी पुरामुळे बांदा शहरात व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी घरात घुसल्याने लोकांच्या सामानाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी मागणी करून बांदा शहरात चार ठिकाणी सायरन बसवण्याची आग्रही मागणीही करण्यात आली. या बैठकीत प्रीतम हरमलकर, रुपेश बांदेकर, प्रथमेश निब्रे, प्रथमेश गवळी, क्षितिज भोगटे, तुषार धामापूरकर, राकेश केसरकर, राजू वाळके, ऋषी हरमलकर, मंदार धामापूरकर आदी व्यापारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page