*💫वेंगुर्ले दि.२६-:* वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बढती दिली असून त्यांच्या उत्कृष्ठ कामाची पोच त्यांना दिली असल्याची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी दिली. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदारपदावर काम करणारे सचिन सावंत यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून तर पोलीस काँन्स्टेबल या पदावर काम करणारे गौरव परब, महिला पोलीस काँन्स्टेबल रुपा पाटील व सरीता दळवी यांची पोलीस नाईक पदावर बढती झाली आहे. बढती मिळालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांचे वेंगुर्ले पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाऱ्यांना बढती
