*💫बांदा दि.२६-:* विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे भूमिपूजन बुधवार दिनांक २८ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. तरी सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सचिव विकास केरकर यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, विद्या विकास मंडळ अध्यक्ष उमेश पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, माजी सभापती मानसी धुरी, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, नारायण राणे, चंद्रकांत गावडे, कृष्णाजी कोठावळे आदी मान्यवर उपास्थित राहाणार आहेत. खासदार तथा सूक्ष्म लघू मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून इन्सुली हायस्कूलला सभागृहासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे 28 रोजी भूमिपूजन
