Headlines

पत्रकार प्रसन्न गोदावळे यांना कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा समावेश;येत्या बुधवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार वितरण

*💫सिंधुदुर्ग दि २४-:* कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचे प्रसन्न गोदावळे यांना जाहीर झाला असून येत्या बुधवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच पत्रकारांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची घोषणा कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी केली आहे. कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पत्रकारांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात दैनिक प्रहारचे सचिन रेडकर, दैनिक पुढारीचे संजय वालावलकर, दैनिक सकाळचे नंदकुमार आयरे, आपला कोकण लाईव्ह चॅनलचे अमित खोत या जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा समावेश आहे. कोकण विभाग पत्रकार संघाचा ९ वा वर्धापन दिन बुधवार २८ जुलै रोजी देशमुख मराठा हॉल, संगम, मुरबाड, जिल्हा ठाणे येथे होणार असून केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात येणार आहेत

You cannot copy content of this page