कोकणातील एस. टी.च्या गावागावांतील फेऱ्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर

*💫कणकवली दि.२६-:* महाराष्ट्रातील कोकण वगळता उर्वरित विभागातील एस. टी. च्या गावागावांतील बहुतांश फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोकणातील एस. टी. च्या अधिकाऱ्यानी कोरोनाचा बागुलबुवा उभा करून अद्यापपर्यंत या फेर्यां सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील मोलमजुरीवर जगणाऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. या फेर्यां लवकरात लवकर सुरु झाल्याच पाहिजेत, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. कोकणातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीबांना एस. टी. हेच एकमेव सोयिस्कर प्रवासी साधन आहे. मात्र तेच बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे नमूद करून ते म्हणतात, ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणी शहरातील विविध प्रकारच्या व्यवसायांच्या, कार्यालयाच्या ठिकाणी नोकरीसाठी जा-ये करतात. तसेच अनेक मजूरवर्ग रोजंदारीवर काम करण्यासाठी शहरांमध्ये येतो. पण एस. टी. च्या फेर्यां बंद असल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर व्यावसायिकांना कामगार उपलब्ध होत नसल्याने व्यावसाय चालविणे कठीण झाले आहे. शेतकरीवर्गांची पावसाळी शेतीची कामे आटोक्यात आली आहेत. तोही आता शहरात येऊन रोजंदारीवर कामे करण्याच्या प्रतिक्षेत आहे. पैकी काहींना खेड्यांतील बागायतींमध्ये कामांसाठी बोलावणे येत आहे. खेड्यापाड्यांतील पावसाळी भाजीपाला, फळे पिकविणार्यांना आपले उत्पादन शहरात आणून विकायचे आहे. मात्र एस. टी. सुरू नसल्याने हा सर्वं वर्ग आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे, अशी माहिती देऊन ते म्हणतात, प्रवाशांची सेवा हे ब्रीद असलेल्या एस. टी. महामंडळाने नफा-तोट्याचा विचार न करता प्रवासी सेवा सुरू ठेवायची असते. राज्य शासन प्रवाशांना अनेक सवलती देते. त्यामुळे एस. टी. आर्थिक भार संभाळण्याची नैतिक जबाबदारी शासनाची आहे. उर्वरित विभागामध्ये प्रवाशांचा हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कोकणातील अधिकाऱ्याना काम करायचे नसल्याने ते एस. टी. सुरू करण्यात चालढकल करीत आहेत. कर्मचाऱ्याना निम्म्या पगार दिला जातो. तोही आर्थिक विवेचंनेत सापडला आहे. बस स्थानकांतील उपग्रुहांसह सर्वं प्रकारची दुकाने बहुतांश अद्याप बंद आहेत. चालू केलेल्याचा व्यवसाय १० टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या कुटुंबियांवर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट कधी संपेल हे सांगता येणार नाही. मात्र रोजगार असूनही शहरांच्या ठिकाणी जाता येत नसल्याने गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोकणातील ग्रामीण भागातील एस. टी. च्या फेर्यां आता विनाविलंब सुरू व्हायलाच पाहिजेत, असे केळुसकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page