वेंगुर्ला प्रतिनिधी-इनरव्हील क्लब वेंगुर्ला यांच्यावतीने येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लबचे ज्योती देसाई, वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, डॉ.धनश्री पाटील, डॉ.मनिषा मुजुमदार, सौ.खोत, रोटरी क्लबचे अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, वसंतराव पाटोळे, डॉ.आनंद बांदेकर, सुहास गवंडळकर उपस्थित होते. इनरव्हील क्लबतर्फे ‘झाडे लावा झाडे जगवा‘ मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे ज्योती देसाई यांनी सांगितले.
इनरव्हील क्लबतर्फे बॅ.खर्डेकर महाविद्यालय आवारात वृक्षारोपण
