*💫वेंगुर्ला दि.२५-:* हिमाचल प्रदेश राज्याचे नवनियुक्त राज्यपाल, गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी रविवारी (२६ जुलै) सपत्नीक आरवली वेतोबा मंदिराला भेट देत श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक आरवली वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वेतोबाला केळ्यांचा घड, धोतरजोडा, नारळ अर्पण करत जनतेला निरोगी आयुष्य आरोग्य लाभू दे असे साकडे त्यांनी वेतोबाला घातले. तसेच यानंतर श्री देव वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी देवस्थान कमिटी तर्फे अध्यक्ष जयवंत राय, विश्वस्त सचिन दळवी, डॉ.प्रसाद साळगावकर, शेखर पणशीकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विश्वस्तांनी गोवा राज्य प्रवेशाबाबत होणारा त्रास आणि अडचणी सांगतात त्या शासकीय पातळीवर दूर करण्याबाबत आर्लेकर यांनी सहमती दर्शवली. तसेच यावेळी उपस्थित अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, पांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार पवीण लोकरे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना श्री.आर्लेकर म्हणाले की, भाजपमध्ये तळागाळातील कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान होतोच. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिलीय. देव वेतोबाच्या कृपेने ती माझ्या हातून योग्य रित्या पार पडावी हीच श्रींचरणी प्रार्थना आहे. यावेळी ग्रामस्थ उत्तम चव्हाण, सिद्धेश चव्हाण, सहदेव शिरोडकर, प्रकाश चव्हाण, अनंत चव्हाण, अनिल चव्हाण, देवदत्त चव्हाण आदी उपस्थित होते.
हिमाचलच्या राज्यपालांनी घेतले श्रीवेतोबाचे दर्शन
