बाबा सावंत यांनी हिवाळे गावडेवाडी रस्त्याची केली डागडुजी

शिवसैनिकांच्या साथीने पाच तास श्रमदान ;हिवाळे ग्रामस्थानी मानले आभार

*💫मालवण दि.२४-:* मालवण-हिवाळे राठीवडे या मार्गावरील हिवाळे गावडेवाडी येथील गणपती मंदिराजवळच्या खड्डेमय रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे ग्रामस्थांनी लक्ष वेधुनही त्याकडे कानाडोळा केल्यानंतर या रस्त्याची डागडुजी आपण स्वखर्चाने करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेना मालवण उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांनी आज अखेर शिवसैनिकांच्या साथीने सुमारे पाच तास श्रमदान करीत या रस्त्याची दुरुस्ती केली . बाबा सावंत यांनी ग्रामस्थांची होणारी परवड थांबविण्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीबद्दल हिवाळे ग्रामस्थानी त्यांना धन्यवाद दिले आहेत मालवण कसाल मार्गावरील हिवाळे गणपती मंदिराजवळ भला मोठा खड्डा पडल्याने साचलेल्या पाण्यामुळे हा खड्डा अपघातास आमंत्रण देत होता त्यातच या खड्डया नजीक तीव्र वळण असल्याने या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत होते तर या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालकाना आपली वाहने कसरत करत वाहने चालवावी लागत होती याबाबत संबंधितांचे अनेक वेळा लक्ष वेधुनही त्याकडे सोयीस्करपणे काणाडोळा केला जात होता असा आरोप ग्रामस्थांनी केला होता या रस्त्याबाबत कुणीच दखल न घेतल्याने शिवसेनेचे मालवण उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांनी पुढाकार घेत शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणानुसार आज हिवाळे विभागातील शिवसैनिकाना साथीला घेत पाच तास श्रमदान करीत या रस्त्याची डागडुजी केली भर पावसात शिवसैनिकांनी या रस्त्यावर येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सुमारे ऐंशी फूट गटारांची खोदाई करण्यात आली असून जवळपास दोन डंपर दगडाचे बांधकाम करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे यावेळी उपतालुकाप्रमुख बाबा सावंत ,हिवाळे सरपंच पुरुषौत्तम खेडेकर , बंडु चव्हाण,ओवळीये सरपंच अंबाजी सावंत ,सुभाष धुरी ,शाखाप्रमुख संजय परब, सचिन परब ,राजेंद्र परब ,राजु धुरी, गितेश खेडेकर ,प्रमोद धुरी, गोट्या गावडे, काका गावडे ,युवराज मेस्त्री ,प्रथमेश गावडे, भाई चव्हाण ,यश लाड ,प्रविण गावडे,बबन परब ,स्वप्नील परब,सुनील परब,सचिन मेस्त्री,मनोज गावडे रवी गावडे ,रमेश गांवकर,व हिवाळे विभागातील सर्व शिवसैनिकानी श्रमदान करीत रस्त्याची डागडुजी केली

You cannot copy content of this page