बांदा शहरातील नुकसानग्रस्त घरांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप

*💫बांदा दि.२४-:* बांदा शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज बांदा येथे जात केली. यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबाना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे बांदा शहरात अनेकांच्या घरात पाणी साचून मोठ्या नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने होत्याचे नव्हते झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पुंडलिक दळवी यांना सोबत घेऊन बांदा येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त घरांना ताडपत्रीचे वितरण करण्यात आले आहे.. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, तालुका सदस्य उद्योग व्यापार संतोष जोईल, उद्योग व्यापार जिल्हा सरचिटणीस नियाज शेख संदीप जाधव, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page