शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांचा पत्रकार परिषदेत सवाल
*💫सावंतवाडी दि.१०-:* नगरपालिकेच्या कौन्सिल सभेत सादर करण्यात आलेला अहवाल बोगस असल्याचा आरोप पुन्हा एकदा जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. तसेच हा अहवाल कोणत्या समितीने बनवला ?, अहवाल बनवताना सभागृहाची परवानगी घेतली का ?, अहवाल बनवताना किती खर्च आला? असे प्रश्न त्यानी उपस्थित केले आहेत. तसेच पालिकेतील कर्मचाऱ्यांना राज्य सरकार पगार देते पालिका नाही. तसेच सावंतवाडीतील विकास कामांसाठी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी निधी दिला असून या विकास कामांची उद्घाटन शिवसेनेचेच नेते करतील असे देखील स्पष्ट केले आहे. सावंतवाडीत झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीत सावंतवाडीतील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवणारे आमदार नितेश राणे निवडणुकीनंतर सावंतवाडीत फिरकले सुधा नसून ते आणि त्यांची विकास कामे कुठे गेली असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे