*💫सावंतवाडी दि.११-:* शहरातील काही दिवसांपूर्वी राणे कुटुंबाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची शिवसेनेच्या हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आले असून, याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष अप्पा पराडकर यांनी दिले आहे. या निवडीमुळे अमित वेंगुर्लेकर यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पक्षात प्रवेश करून अवघ्या काही दिवसातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरी मुळे त्यांची नियुक्ती शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी करण्यात आली आहे.
अमित वेंगुर्लेकर यांची शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती
