निवडणुकीत मल्टी स्पेशलिस्ट बांधण्याचे आमिष दाखवून सावंतवाडीतील जनतेची केसरकरांनी केली फसवणूक

*शल्य चिकित्सकांची बदली करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न फसले

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टिका*

*💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्याचे आमदार निवडूनकीच्या तोंडावर मल्टी स्पेशलिस्ट हाॅपिस्टल होणार असे सांगत भुमिपूजन करून लोकांची दिशाभुल करत एक प्रकारची सावंतवाडी तालुक्यातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे सोडून सत्ताधारी जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्यासाठी प्रयत्न करत होते. सत्ताधाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनाची माहिती नसल्यानेच ते निष्फळ ठरले असून जिल्हा शल्य चिकीत्सकांची बदली रद्द करून सत्ताधाऱ्यांना तोंडावर पाडले आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची गरज असताना असे प्रयत्न न करता विकासाकडे लक्ष द्यावा असा सल्ला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिल आहे. सावंतवाडी शहरातील नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज चालेला वाद थांबवून दोघांनी एकत्र येऊन यावर सुवर्णमध्य काढावा असा सल्ला देखील उपरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page